नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानुसार वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मुलभूत वेतन, निवृत्तीवेतनावर सध्या २८ टक्के दराने दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याव्यतिरिक्त हा अधिकचा ३ टक्के भत्ता असेल आणि तो १ जुलै २०२१ पासून देय असणार आहे.
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीवर आधारित स्वीकृत सूत्रांनुसार ही वाढ देण्यात आली आहे. महागाई भत्ता आणि दिलासा निधीपोटी देशाच्या तिजोरीवर दर वर्षी ९,४८८.७० कोटी रुपयांचा बोजा पडणार असून सुमारे ४७ लाख १४ हजार केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख ६२ हजार निवृत्तीवेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…