Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरुस्ती सुरू

डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरुस्ती सुरू

नीलेश कासाट

कासा : डहाणू-जव्हार या राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात खड्डे पडत असून मोठ्या रहदारीचा हा मार्ग असल्याने अनेक वाहनचालकांना यामुळे त्रास होत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झालेले आहेत. ह्या बाबतची बातमी ‘दै. प्रहार’ने प्रकाशित केली होती. अखेर दि. १९ ऑक्टोबरपासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार पडलेल्या पावसामुळे कासा ते डहाणू दरम्यान रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले होते तर, अनेक वाहनचालकांची वाहने नादुरुस्त झाली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून नागरिक व वाहनचालक या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत होते. अखेर मंगळवारी या मोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम खात्याने हाती घेतले. डंपर, रोलर व अनेक मजूरांच्या साहाय्याने त्यांनी डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.

डहाणू-नाशिक हा राज्यमार्ग असून मोठी रहदारी या नियमित रस्त्यावर असते. त्यात कासा ते डहाणू रस्त्यावर वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. डहाणू येथे मोठी बाजारपेठ असल्याने अनेक खेडोपाड्यातील नागरिक खरेदीसाठी या रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे या रस्तावर नेहमी वर्दळ असते.

गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या तक्रारी येत होत्या. सध्या मोठे खड्डे भरण्याचे काम सुरू असून लवकरच हा रस्ता पूर्ण डांबरीकरण केला जाणार आहे. यासाठीची निविदा काढली आहे. - धनंजय जाधव, अभियंता, बांधकाम विभाग डहाणू

अनेक दिवसांच्या मागणीने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले. नुसते खड्डे भरून चालणार नाही, तर हा पूर्ण रस्ताच डांबरीकरण केला पाहिजे. - अशोक भोईर, सामाजिक कार्यकर्ते

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा