Sunday, October 26, 2025
Happy Diwali

फॅबियन अलेन दुखापतीमुळे बाहेर

फॅबियन अलेन दुखापतीमुळे बाहेर

दुबई (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिज संघात एक बदल करण्यात आला असून दुखापतग्रस्त अष्टपैलू फॅबियन अलेनच्या जागी डावखुरा फिरकीपटू अकील होसेनचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या इव्हेंट तांत्रिक समितीने त्याला मंजुरी दिली आहे.

टी-ट्वेन्टी प्रकारात अलेनची गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली आहेअ. त्याचा फलंदाजी स्ट्राइक रेट १३८ हून अधिक आहे. क्षेत्ररक्षणातही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला त्याची अनुपस्थिती जाणवेल. २८ वर्षीय होसीनने आजवर नऊ वनडे आणि सहा टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. कॅरेबियन्स प्रीमियर लीगमध्ये त्याने त्रिनिदाद नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना ११ सामन्यांत १५.९२च्या सरासरीने १३ विकेट घेतल्यात. वेस्ट इंडिजच्या राखीव खेळाडूंच्या यादीत गुडाकेश मोटीला त्यात सहभागी करण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज संघ : कीरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पुरन, ख्रिस गेल, अकील होसेन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एव्हिन लुईस, रवी रामपाल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, अल्फोन्सो थॉमस, हेडन वॉल्श. राखीव : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर, गुडाकेश मोटी

Comments
Add Comment