Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

राज्यात दिवसभरात २ हजार ७९१ जण कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात २ हजार ७९१ जण कोरोनामुक्त

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही घट झाली आहे. मंगळवारी २ हजार ७९१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २४ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के एवढे झाले आहे.


मंगळवारी राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९४ हजार ८२० झाली आहे. तर मंगळवारी ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात एकूण २६ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१२,४८,८२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९४,८२०नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०९,७९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Comments
Add Comment