Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला

भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला

पुणे : हिंदुत्वाच्या मुद्दावर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची भेट घेत मनसेने भाजपसोबत जावे, असा सल्ला दिला होता. यावर राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला असून मनसेमुळे नुकसान होऊ शकते, असा इशाराही भाजपाला दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.


आरपीआय सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, असा इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.


दरम्यान आरपीआयला पुण्यात आणि मुंबईत महापौर पद मिळावे, अशी मागणी देखील आठवले यांनी केली आहे.

Comments
Add Comment