Monday, October 27, 2025
Happy Diwali

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप करणार निदर्शने

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप करणार निदर्शने

मुंबई : भाजप कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्या वतीने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी निदर्शने करण्यात येणार आहे. वडाळा आगार येथे मोठ्या संख्यने निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती भाजप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली.

बेस्ट अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलीनीकरण करा, बेस्ट बस चालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घ्या, स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखा, कोविड चार्जशीट रद्द करा, कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्या, बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान मुंबई महानगरपालिका कर्मचऱ्यांप्रमाणे मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा