
भारताची गाठ इंग्लंडशी
दुबई/अबुधाबी (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यांना सोमवारपासून (१८ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी भारत आणि इंग्लंड हे माजी विजेते आमनेसामने आहेत. विराट कोहली आणि सहकाऱ्यांचा दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० ऑक्टोबरला होईल. सर्व सराव सामने स्टार स्पोर्ट्ससह डिझनी प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत.