Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

तब्बल १९ महिन्यांनी धावली 'सिंहगड'

तब्बल १९ महिन्यांनी धावली 'सिंहगड'

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. जवळपास १९ महिन्यांनंतर सुरू झालेल्या या सेवेमुळे मुंबईकर व पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


कोरोनाच्या संसर्गानंतर मागील वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. रेल्वे प्रवासावरही निर्बंध घालण्यात आले होते. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस ही सेवा देखील बंद करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बहुतेक सर्व व्यवहार खुले झाले. मुंबईतील लोकल ट्रेनही काही अटींवर सुरू करण्यात आली.


Comments
Add Comment