Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीदिवाळीपर्यंत कांदा महागण्याची शक्यता

दिवाळीपर्यंत कांदा महागण्याची शक्यता

परतीच्या पावसाचा पिकांना झटका

मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाचा कांदा पिकांना जोरदार फटका बसला आहे. या पावसाने नवीन कांदा पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत असून दिवाळीपर्यंत कांदा आणखी कडाडण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीच्या पावसाने कहर केला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कांद्याला जास्त मागणी आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होईल. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत येथील शेतकरी कांद्याचा पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो मिळत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १०० ते १३० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. येथे ३० ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या किरकोळ बाजारात हा कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकला जात आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -