Friday, October 31, 2025
Happy Diwali

कलाकारांचे मानधन दुप्पट, तर गरिबांच्या पगारात कपात का?

कलाकारांचे मानधन दुप्पट, तर गरिबांच्या पगारात कपात का?

मुंबई : कोरोना काळात अनेक बड्या कलाकारांचे मानधन दुप्पट करण्यात आले, मात्र याच क्षेत्रात काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचे म्हणजेच लाईटमॅनसारख्या अनेक गरिबांच्या वेतनात कपात करण्यात आली. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या या भेदभावाच्या वागणुकीवर अभिनेता रोनीत रॉयने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता रोनीत रॉय म्हणाला, 'मी केलेल्या पडताळणीत मला असे समजले की, अनेक ए-लिस्टर्स कलाकारांचे पगार (मनधन) दुप्पट करण्यात आले आहे. मात्र, गरिबांचे पैसे कापण्यात आले. आमच्या क्षेत्रात ज्याप्रकारे भेदभाव घडत आहे तो खूप चुकीचा आहे.' तसेच गरीब कुटुंबातील व्यक्तीचा पगार कापणे हे लाजिरवाणे असल्याचे रोनीत म्हणाला.

'एका लाईटमॅनला त्याचे संपूर्ण घर चालवायचे असते. त्यामुळे त्याचा पगार कापून तुम्हाला काय मिळणार? पगार कमी करायचाच असेल तर बड्या कलाकारांचा करा...गरिबांसोबत असे का वागता? हे वागणे योग्य नाही,' असे रोनीत रॉय म्हणाला.

रोनीत रॉयची स्वत:ची सेक्युरीटी एजन्सी आहे. रोनीत सर्व बॉलिवूड कलाकारांना सुरक्षा आणि बॉडीगार्ड पुरवतो. कोरोना काळात अनेक कलाकारांनी बॉडीगार्डची गरज नसल्याचे सांगून त्यांना कामावरून कमी केले होते. त्यामुळे रोनीतने १२५ कर्मचाऱ्यांना स्वत: पगार दिला. दीड वर्षाचा काळ खूप कठिण असून या काळात खूप शिकायला मिळाले, असे रोनीत म्हणाला.

Comments
Add Comment