Friday, May 9, 2025

महामुंबईठाणे

अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमिनदोस्त

अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमिनदोस्त

डोंबिवली (वार्ताहर) : डोंबिवली पूर्वमधील आयरे गाव येथील बालाजी गार्डनच्या पाठीमागे अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. निष्कासनाची कारवाई ग प्रभागातील सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी आपल्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत सुरु केली होती.


अनधिकृत इमारत सोमवारी पोकलेन मशिनच्या सहाय्याने,अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तसेच महापालिकेतील पोलिस विभागाच्या सहकार्याने पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात आली. यावेळी विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, ग व ह प्रभागाचे सहा.आयुक्त सुहास गुप्ते, फ प्रभागाचे सहा. आयुक्त भरत पाटील समक्ष उपस्थित होते.महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment