बाळासाहेबांनी विचारांचे सोनं लुटले हे महाराष्ट्र लुटायला निघालेत
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर केलेल्या टीकेचा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटायचे. मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
कालच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचं भाषण होतं की रडगाणं होतं. इतका रड्या प्रमुख दुसरा नाही. नेहमीची किर किर, आदळ आपट पण निष्पन्न शून्य. म्हणे मी राजकारणातून बाजूला झालो असतो, बरं झालं असतं महाराष्ट्र वाचला असता. चायना मध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, total waste of time.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 16, 2021
ते मुख्यमंत्र्यांसारखे कधीच बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अंगी असावे लागतात, तसे गुण त्यांच्यामध्ये नाहीत. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्या विचारांची मर्यादाच तेवढी आहे. त्यामुळे ते दुसरे काही बोलू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचे भाषण होते की रडगाणं होते? नेहमीची किर-किर, आदळ-आपट पण निष्पन्न शून्य. म्हणे मी राजकारणातून बाजूला झालो असतो! बरे झाले असते महाराष्ट्र वाचला असता, असे सांगून, चायनामध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.
VIDEO : Nilesh Rane On CM : मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांच्या टीकेवर निलेश राणेंकडून उत्तर#UddhavThackeray #ShivSenaMelawa2021 #Devendrafadnavis #Dasara2021 @meNeeleshNRane pic.twitter.com/OA6WWfkbGT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021