Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणारी डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळविली जाईल. घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाऊन कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी /वांद्रे डाउन आणि अप हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी /बेलापूर /पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे /गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी शनिवारी- रविवारी रात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी-रविवारच्या रात्री ११. ५० ते पहाटे ४. ३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -