Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाभारताने कोहलीसाठी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकावा

भारताने कोहलीसाठी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकावा

सुरेश रैनाची अपेक्षा

दुबई (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या आयोजनाखालील संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणारा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारताने विराट कोहलीसाठी जिंकावा, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केली आहे.

विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्याच्या नेतृत्वाखालील ट्रॉफी उंचावण्यादृष्टीने प्रत्येक क्रिकेटपटूने प्रयत्न करावेत. यंदाच्या वर्ल्डकप जेतेपदासाठी भारताचा संघ प्रबळ दावेदार आहे. त्यातचभारताचे सर्वच क्रिकेटपटू आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळले. वर्ल्डकप युएईत होत असल्याने आयपीएलचा फायदा त्यांना होईल. आयपीएलमुळे युएईतील खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेणे भारताच्या क्रिकेटपटूंना सोपे होईल, असे रैनाने म्हटले आहे. यंदाच्या वर्ल्डकपनंतर टी-ट्वेन्टी प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे.

भारताची बहरलेली आघाडी फळी सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाची ठरेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे. त्यात उपकर्णधार रोहित शर्माची बॅटिंग निर्णायक ठरेल, असे त्याने म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -