Saturday, October 25, 2025
Happy Diwali

'...मी लहान होत नाही आणि मोठीही नाही'

'...मी लहान होत नाही आणि मोठीही नाही'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणाऱ्या त्या एवढ्या मोठ्या नेत्या नसल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे पवारांना प्रत्युत्तर देत पंकजा मुंडे म्हणाल्या, 'त्यांच्या बोलण्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होणार नाही.'

'मी शरद पवारांचे बोलणे ऐकले नाही परंतु मोबाईलवर पाहिले. ते जे काही बोलले ते खरे आहे. मी मोठी नेता नाही. मी लहान आहे आणि मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोलले पाहिजे. लहानांना शिकवले पाहिजे आणि प्रोत्साहनही दिले पाहिजे. परंतु त्यांनी असे व्यक्तव्य केले असेल तर मी लहान होत नाही आणि मोठीही नाही. मी तेवढीच राहणार आहे. ते आमच्यापेक्षा मोठे नेते आहेत यात काही वादच नाही.' असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Comments
Add Comment