
मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या कोठडीत आहे. येथे त्याचे समुपदेशन करण्यात आले असून सर्वांना गर्व वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनादरम्यान दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.
क्रूझ पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेले आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे, त्यांचे अमली पदार्थ सेवनाने स्वत:वर व समाजावर होणारे दुष्परिणाम यावर एका सामाजिक संस्था आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. आर्यन खान याच्या समुपदेशनावेळी एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे उपस्थित होते. मी येथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती बनून दाखवेन, चांगली कामे करेन, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना गर्व वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न करेन, असा शब्द आर्यन खानने समुपदेशनावेळी समीर वानखेडे आणि सामाजिक संस्थेला दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आर्यन खान आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने अटक केली होती.