पुणे (प्रतिनिधी) : दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता, त्यावेळेस मीच उद्धव ठाकरे यांचा हात धरत हेच मुख्यमंत्री होतील असे आमदारांच्या बैठकीत सांगितले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असून शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी का बसवले नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी याबाबतचा घटनाक्रम मांडला.
राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता. सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केले होते. मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचे, यासंबंधी दोन-तीन नावे आमच्याकडे आलेली होती. सुरुवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदास त्यांनी नकार दिला होता. त्यांना अक्षरश: सक्तीने मी त्यांना हात वर करायला लावला. मी त्यांचा हातवर केल्याने त्यांनी नेतृत्व स्वीकारले. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा हात वर केला, असे शरद पवार म्हणाले.
शेतकरी आंदोलनात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश तसेच राजस्थानच्या काही भागातील जास्तीत जास्त लोक सहभागी आहेत. त्यातल्या त्यात पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आमचे केंद्र सरकारला सांगणं आहे की पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला. एकदा देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिली आहे. ही किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत दिली आहे, असेही ते म्हणाले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…