Monday, July 1, 2024
Homeमहत्वाची बातमीठाकरे परिवार सोडून अन्य कोणीही मुख्यमंत्री होणार नाही

ठाकरे परिवार सोडून अन्य कोणीही मुख्यमंत्री होणार नाही

आमदार नितेश राणे यांचे टीकास्त्र

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना पहिल्यापासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणूनच त्यांनी पूजापाठ केले. राज ठाकरे, नारायण राणे यांना षङ्यंत्र करून बाहेर केले. दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकांना माझे आवाहन आहे. मी लहान आहे. पण तुम्हाला कधीच संधी मिळणार नाही. ठाकरे परिवार सोडून शिवसेनेतील अन्य कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याशिवाय कुणीही कधी मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाही नितेश राणेंनी केला आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जवळपास तासभर भाषण केले. यात हिंदुत्व, ड्रग्ज प्रकरण, लखीमपूर हिंसाचार या मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, भाजपवरही जोरदार टीका केली. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीही शंका उरलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खोटे बोलणारे आवडत नव्हते. मात्र, दसरा मेळाव्यातील भाषणात प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा होता. बाळासाहेब असते तर सगळ्यात आधी यांनाच हाकलून दिले असते, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

१९९३ला शिवसेनेत तरी होते का हे? हे तर फोटो काढत फिरत होते. राज ठाकरे, नारायण राणे त्यावेळी शिवसेनेत होते. एकनाथ शिंदेंनी विचार करावा, असे सांगून नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे भाषण हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी धोका आहे. बंगाल पॅटर्नमध्ये ४० हजार हिंदू मारले गेले, तिथे हिंदुत्वाची व्याख्या सांगणार का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर ‘हिंदू खतरे में है,’ त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असतील, असेही नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -