
दसरा मेळाव्यानंतर नितेश राणेंचा खोचक टोला
मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता काहीच फरक राहीलेला नाहीये, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो, कुठलीच शंका नाही, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1449075889380069381
दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. या भाषणातून त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर हल्लाबोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर भाजपकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना राहुल गांधीशी केलेल्या टीकेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.