‘चल पड़ते हैं तेरे साथ कदम, मैं रोक नहीं पाता हूँ’

Share

श्रीनिवास बेलसरे

मरिओ पुझोंची १९६९साली प्रकाशित झालेली कादंबरी ‘द गॉडफादर’ प्रचंड गाजली. तिच्या ९० लाख प्रती खपल्या होत्या. पुझो हे न्यूयॉर्क इथे जन्मलेले स्थलांतरित इटालियन-अमेरिकी लेखक! त्यांनी इटलीच्या सिसिली प्रांतातील गुन्हेगारी टोळ्यांच्या अमेरिकेतील ‘उद्योगांवर’ कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या गाजल्याही! ‘पॅरामाउंट पिक्चर्स’ या नामवंत कंपनीने ‘गॉडफादर’वर सिनेमाही (१९७२) काढला. त्याला ऑस्करही मिळाले होते.

‘द गॉडफादर’चे बेमालूम भारतीयकरण करून काढलेला सिनेमा म्हणजे फिरोझ खानचा १९७५साली आलेला ‘धर्मात्मा’! मरिओ पुझोंच्या कथेची ताकद एवढी की, त्याच वेळी आलेल्या ‘शोले’ आणि ‘दिवार’च्या झंजावातातही धर्मात्माने बॉक्स ऑफिसवर अडीच कोटींचा म्हणजे, तेव्हाच्या हिशेबाने, जबरदस्त धंदा केला! ‘धर्मात्मा’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अफगाणिस्तानमध्ये चित्रित झालेला हा पहिला हिंदी चित्रपट!

गोरगरिबांना नेहमी मदत करणाऱ्या प्रतिष्ठित धर्मदास सेठची (प्रेमनाथ) एक काळी बाजू म्हणजे तो ‘मटकाकिंग’ असतो. त्याचा मुलगा रणबीरला (फिरोज खान) हे आवडत नसल्याने एका वादावादीनंतर तो अफगाणिस्तानात निघून जातो. तिथे एका आदिवासी मुलीला (हेमा मालिनी) वाचवताना तिच्या प्रेमात पडतो आणि कथा सुरू होते. त्याकाळी हेमा मालिनी ही संपूर्ण देशाची ड्रीमगर्ल होती! त्यामुळे तिच्यावर लिहिलेली गाणीही खूप लोकप्रिय. इंदीवर या जुन्या सिद्धहस्त गीतकारांनी लिहिलेल्या गाण्याला संगीत होते कल्याणजी आनंदजींचे आणि नायकाला शोभणारा दमदार आवाज किशोरदांचा! गाण्याच्या पहिल्याच ओळीने युवावर्गाला जिंकून घेतले.

तेरे चेहरे में वो जादू है, बिनडोर खिंचा जाता हूँ
जाना होता हैं और कहीं, तेरी ओर चला आता हूँ

हेमामालिनीने तिच्या अनेक मोहक अदांनी गाणे जास्तच रोमँटिक करून टाकले. ज्यांनी इंग्रजी ‘गॉडफादर’ वाचला त्यांना ‘अपोलोनिया’ या सौंदर्यवतीसाठी हेमा मालिनीशिवाय पर्यायच नव्हता, हे सहज पटते. पुढचे शब्द इंदीवर यांनी जणू तिच्यासाठीच लिहिले –

तेरी हिरे जैसी आँखे, आँखों में है लाखो बातें
बातों में रस की बरसते,
मुझ में प्यार की प्यास जगाये

हेमा मालिनीच्या सौंदर्याने आणि नृत्यकौशल्याने त्याकाळी सगळी चित्रपटसृष्टी जिंकून टाकलेली होती. धर्मात्माच्या या गाण्यातील एकेक ओळ तिच्यासाठी आणि अपोलोनियाच्या पात्रासाठीही तंतोतंत लागू पडत होती.

तू जो एक नज़र डाले, जी उठें मरने वाले,
लब तेरे अमृत के प्याले,
दिल में जीने की आस बढ़ायें

एकेका काळात कलाविश्वातील अशा एखादी मदनिका किंवा अमिताभ बच्चनसारखा अभिनेता समाजमनावर अधिराज्य गाजवतो! अनेक अभिनेत्री आल्या-गेल्या, पण हेमा मालिनीचे हे राज्य आजही अबाधित आहे. अशीच दुसरी व्यक्ती म्हणजे रेखा! चतुर फिरोझ खानने चित्रपटाच्या उत्तरार्धासाठी तिचीही निवड केली होती.

‘द गॉडफादर’मधल्या अपोलोनियाच्या सौंदर्याने घायाळ झालेला मायकेल फिरोज खानने हिंदीत उत्तम वठवला. एका डॉनचा मुलगा असलेला मायकेल ज्या कामासाठी सिसिलीत जातो तेच विसरतो, इतके अपोलोनियाचे सौंदर्य त्याला मोहवून टाकते. हे गाणे पाहताना वारंवार एक जाणवते-आजच्या सिनेमात जो अंगचटीला येणारा रोमान्स दाखवतात, त्याला रोमांस म्हणणेच कितपत योग्य आहे? त्या तुलनेत फिरोझ खानने चितारलेला ५ फुटांवरचा रोमान्स खूपच सोज्वळ वाटतो. साध्या सरळ अभिनयाने त्याने कथानक व्यवस्थित पुढे नेले होते.

कोणत्याही प्रेमकथेत अशी एक वेळ येतेच की, जेव्हा प्रियकर आपोआपच प्रियेच्या मागे ओढला जात राहतो. मग ती पडद्यावरची प्रेमकथा असो की, एखाद्या चाळीत घडलेली! प्रियकरासाठी प्रियेची आवड ती त्याची आवड, तिचे ध्येय ते त्याचे ध्येय बनून जाते. मनाची एक भारलेली अवस्था असते ती! सारासार विचार, स्वसन्मान, चांगल्या-वाईटाची समज, हित-अहित या सगळ्या गोष्टी त्या धुंद काळात नगण्य होऊन जातात. कुणी काहीही म्हणो, त्या बेधुंद अवस्थेची मजाच काही वेगळी असते –

चल पड़ते हैं तेरे साथ कदम, मैं रोक नहीं पाता हूँ
तेरे चेहरे में वो जादू है’

प्रेमवीराला ‘मेरी खुशियों का तू हैं खजाना’ असे वाटू लागते. तो स्वत:च ही कबुली प्रियेपुढे देतो –

जब से तुझ को देखा है, देख के खुदा को माना है,
मान के दिल ये कहता है,
मेरी खुशियों का तू है खज़ाना

स्वाभाविकपणे आपल्या जीवनातील पोकळीचा उल्लेख आणि पुढची अपरिहार्य अशी त्याची प्रेमयाचना येते –

दे दे प्यार की मंजुरी, कर दे कमी मेरी पुरी
तुझ से थोडी सी दुरी, मुझ को करती है दिवाना

इथे हेमा मालिनी एका कबिल्याच्या प्रमुखाची मुलगी असते. तिच्यावर सर्व कबिल्याचे संरक्षक कवच असते, सर्वांचे लक्ष असते. तिचा एक त्याच कबिल्यातील मंगेतरही असतो. अशा मुलीशी कबिल्याबाहेरच्या, इतर जातीच्या, मुलाचे प्रेम अशक्यच! ही जाणीव रणजितला अस्वस्थ करते. म्हणून तर तो म्हणतो –

पाना तुझ को मुश्कील ही सही,
पाने को मचल जाता हूँ
तेरे चेहरे में वोह जादू हैं…

कल्याणजी आनंदजी यांनी गाण्याच्या संगीताला काहीसा अरबी टच दिला होता. अनेकदा परदेशी कथा उचलणे एखाद्या कलाकृतीचे गुण कमी करते. पण तेही एका पातळीवर मोठे आव्हान असते. ‘धर्मात्मा’ एका अमेरिकी गुन्हेपटावर बेतलेला सिनेमा आहे, हे सांगितल्याशिवाय कळत नाही, इतके त्याचे सुंदर भारतीयकरण फिरोझ खानला जमले होते. आपण आजही जुन्या सिनेमातील काही चेहऱ्यामागे खेचले जातो. जुनी गाणी, कथा, त्या जिवंत करणारे कलाकार, आपल्याला सुखद भूतकाळात घेऊन जातात, जे हरवले त्याची हुरहूर लावणारी आठवण करून देतात हा नॉस्टॅल्जिया नाही तर काय?

Recent Posts

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

32 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

4 hours ago