Monday, November 11, 2024
Homeमहत्वाची बातमी२०० नागरिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानमध्ये आयएसआयची बैठक

२०० नागरिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानमध्ये आयएसआयची बैठक

काश्मिरी पंडित आणि भाजपाशी संबंधित लोक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अनेक दहशतवादी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीचे काही विशेष तपशील एका इंग्लिश नियतकालिकाने मिळवले आहेत. भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआयचे अधिकारी आणि दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या या गोपनीय बैठकीची माहिती मिळाली. त्यानुसार, एजन्सींनी अलर्ट जारी केला आहे.

 

या अलर्टनुसार, बैठकीत आयएसआयने जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची योजना तयार केली होती. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना मारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुख्यत्वे पोलीस, सुरक्षा दल, गुप्तचर खात्यांसोबत काम करणाऱ्या काश्मिरींना ठार मारण्याचे ठरले होते.

 

आयएसआय अधिकारी आणि दहशतवादी गटांचे नेते यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत काश्मिरी नसलेल्या लोकांना आणि भाजपा तसेच आरएसएसशी संबंधित लोकांनाही मारण्यासाठी लक्ष्य म्हणून निवडण्यात आले होते. आयएसआयने काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण करण्यासाठी २०० लोकांची हिट-लिस्ट बनवून त्यांची हत्या करण्याची योजना आखली होती.

 

भारत सरकारच्या जवळचे मीडिया कर्मचारी आणि भारतीय एजन्सी आणि सुरक्षा दलांचे स्रोत आणि माहिती देणाऱ्यांव्यतिरिक्त, या यादीत अनेक काश्मिरी पंडितांची नावे समाविष्ट आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -