Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडी'मुख्यमंत्री बायकोच्या नावाने घोटाळे करतील तर जनता जाब विचारेलच'

‘मुख्यमंत्री बायकोच्या नावाने घोटाळे करतील तर जनता जाब विचारेलच’

किरीट सोमय्यांची सरकारवर टीका

मुंबई : दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ‘कोणाच्याही बायका मुलांवर आरोप करणे हा अक्करमाशीपणा आहे’, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावर आता सोमय्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, ‘मी ठाकरेंनी केलेल्या विधानाशी सहमत आहे. खोटे आरोप केलेले योग्य नाही. परंतु उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावाने घोटाळा करत असतील तर जनता सवाल करणारच. मुख्यमंत्री लुटमार करतात. उपमुख्यमंत्री तर अरे बापरे!.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान केले होते की, माझ्या बहिणीच्या घरी इनकम टॅक्सवाले का गेले? किरीट सोमय्यांनी सगळी कागदपत्रे ठेवली ना? तर बायकोच्या नावाने, बहिणीच्या नावाने घोटाळा करणे हे त्याहीपेक्षाही मोठे पाप आहे. मग ते मुख्यमंत्री असो, वा उपमुख्यमंत्री असो! असे सोमय्या म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्या बिल्डरसोबत संचालक होता, किरीट सोमय्याने कागदपत्रे ठेवली ना? मग पार्टनरशीप का मागे घेतली? त्यामुळे पार्टनरशीपचा मिळालेला पैसा बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणार असाल तर त्याचा जाब मुख्यमंत्र्यांना देणे भाग आहे असे ते म्हणाले.

पवार कुटुंबावरही टीका

‘अजित पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार आणि आता ठाकरे सरकारमध्ये एक नवीन माफिया साथीदार सापडला आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे. आता हे पहिला हल्ला सुरू करून सीबीआय, ईडी, इनकम टॅक्सना टार्गेट करणार, आमच्या बायका-मुलांवर कारवाई होत आहे, हे सर्व मोदी घडवून आणत आहेत असे बोलणार. समाजातले कार्यकर्ते जे ह्यांचेच पीआर यंत्रणा आहेत तेही आपले काम सुरू करणार. परंतु राज्याच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणेमध्येही काही चांगले अधिकारी आहेत. आणि न्यायालयही जनतेच्या बाजूने उभे राहणार.’ असे सोमय्या म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -