Sunday, May 25, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

'स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही सरकार निर्लज्जासारखं वागतयं'

'स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही सरकार निर्लज्जासारखं वागतयं'

मुंबई : राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षांचा पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. परिक्षेच्या वेळापत्रकानुसार एकाच तारखेला दोन परीक्षांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नियोजन केले आहे. उमेदवारांना निवडलेली केंद्रे न देता लांबचे केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यामुळे विरोधी पक्षनेते भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


पडळकर म्हणाले, 'सरकारने एकाच दिवशी दोन परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवल्या आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षेला सामोरे जाण्याचा अधिकारच नाकारत आहात. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचे सरकार निर्लज्जासारखे वागत आहे.'


https://twitter.com/GopichandP_MLC/status/1449268419782533125?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1449268419782533125%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fmla-gopichand-padalkar-criticizes-the-state-government-on-the-issues-of-health-department-examinations-msr-8-2634316%2F

ट्विटरवर व्हिडिओ सामायिक करत पडळकर म्हणाले, 'आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परीक्षा रद्द केली. कोरोना काळातही परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने माघारी फिरवलं. सरकारी परीक्षेत गोंधळ घालायची सरकारला सवयच आहे. तसेच 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सरकारने सहा वेळा पुढे ढकलली. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. परंतु, सरकारला कसलेही गांभीर्य नाही. प्रशासन आणि सरकारमध्ये कसलाही ताळमेळ राहिलेला नाही, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment