Sunday, October 19, 2025
Happy Diwali

पाकिस्तानच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकाचा राजीनामा

पाकिस्तानच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकाचा राजीनामा

इस्लामाबाद (वृत्तसंस्था): न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ग्रँट ब्रँडबर्न यांनी पाकिस्तानच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे टी-ट्वेन्टी विश्वचषकापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मी सुवर्ण आठवणी आणि एक अद्भुत अनुभव घेऊन निरोप घेत आहे, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ब्रँडबर्न म्हणाले की, कोरोना प्रोटोकॉलमुळे कुटुंबासोबत वेळ घालवू शकलो नाही. माझी पत्नी मारी आणि तीन मुलांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करताना खूप त्याग केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात येऊन येथील प्रेम आणि मैत्रीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अनेक आव्हाने होती. मला आता माझ्या कुटुंबाला प्राधान्य देण्याची आणि पुढील कोचिंगच्या आव्हानाकडे जाण्याची वेळ आली आहे.

ब्रँडबर्न हे गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संबंधित होते. न्यूझीलंडचे माजी कसोटी फिरकीपटू असलेल्या ब्रँडबर्न यांनी सप्टेंबर २०१८ ते जून २०२० या कालावधीत पाकिस्तानी संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. यानंतर त्यांनी कोचिंगच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली. ग्रँट ब्रँडबर्न १९९० ते २००१ दरम्यान ऑफ स्पिनर म्हणून न्यूझीलंडकडून खेळले आहेत. त्यांच्या नावावर सात कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने आहेत. ते न्यूझीलंड अ आणि न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

रमीझ राजा यांनी पीसीबीच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारल्यापासून पद सोडणारे ब्रँडबर्न हे पाचवे सर्वोच्च अधिकारी आहेत. या आधी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबा-उल-हक, गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस, मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान आणि विपणन प्रमुख बाबर हमीद यांनी राजीनामा दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा