Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीजेईई अ‍ॅडवान्स परीक्षेत मृदूल अग्रवाल देशात पहिला

जेईई अ‍ॅडवान्स परीक्षेत मृदूल अग्रवाल देशात पहिला

नवी दिल्ली : जेईई अ‍ॅडवान्स २०२१ परीक्षेत जयपूरच्या मृदूल अग्रवालने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये दिल्ली झोन मधून काव्या चोप्रा या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आला आहे. मृदूलने आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेत ३६० पैकी ३४८ गुण मिळवून आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याची टक्केवारी ९६.६६ इतकी आहे. २०११ नंतर हे कुठल्याही विद्यार्थ्याने मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत.

निकालात देशभरातून ४१ हजार ८६२ विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत. मुंबईचा कार्तिक नायर हा विद्यार्थी देशातून सातवा आणि राज्यातून पहिला आला आहे तर निरिजा पाटील ही मुंबई झोन मुलींमध्ये पहिली आली आहे.

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) कडून जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर करण्यात आला. आता जेईई अ‍ॅडवान्सचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे. एनटीएकडून बीटेकचे निकाल आधीच जाहीर करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -