
दानवेंचा सेनेला सवाल
जालना (वृत्तसंस्था) : ‘राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली आहे’, अशी टीका शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे. ‘जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले?’ असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत शिवसेनेला उत्तर दिले आहे. ‘जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले?. हे वाघ नाहीत मेंढी आहेत. हे वाघ नाहीत यांनी फक्त वाघाचा चेहरा लावला आहे. या वाघाला शेपटी पण नाही’, असेही दानवे म्हणाले.