नीलेश राणेंचे अजित पवारांना आव्हान
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्याकडून मोठी चूक झाली. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे हे टीकेच्या रडारवर आले आहेत. याबाबत आता माजी खासदार, महाराष्ट्र भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी नवघरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी तोफ डागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हारामखोरला भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात. pic.twitter.com/nf3AyNJR6P
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 14, 2021
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके मारले पाहिजेत. राष्ट्रवादीवाल्यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिंमत असेल तर ‘याची’ पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत या पक्षात,’ अशी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.आमदार नीतेश राणे यांनीही नवघरे यांचा तो फोटो ट्वीट करून राष्ट्रवादीवर शरसंधान साधले आहे. ‘याला सत्तेचा माज म्हणतात. हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत,’’असे त्यांनी म्हटले आहे.
या माणसाला मंत्री कोणी केला त्या व्यक्तीचीच नवल वाटते. रोज उठून ड्रग माफियाची बाजू घेताना लाज वाटत नाही त्यावरून वाईट म्हणजे पक्षामध्ये पवार कुटुंब अशा निर्लज्ज व्यक्तीला थांबू शकत नाही यावरून राष्ट्रवादी पक्षामध्ये काय चालतं हे स्पष्ट आहे. याचा जावई काय करतो हे जगजाहीर आहे. https://t.co/0WWCcqsiHa
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 14, 2021