Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरदसऱ्याच्या निमित्ताने झेंडूची विक्री जोरात

दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूची विक्री जोरात

फुलांना प्रति किलो १४० ते १५० रुपये भाव

जव्हार (वार्ताहर) : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. तसेच, मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली असून झेंडूच्या फुलांची जोरात विक्री सुरू आहे. फुलांना प्रति किलो १४० ते १५० रुपये असा भाव मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर दुसरीकडे, भाव वाढूनही ग्राहकांकडून फुलांची खरेदी जोरदार सुरू असल्याने विक्रेते आनंदून गेल्याचे चित्र दिसत आहे.

शारदीय नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच दसरा तथा विजयादशमी. भारतीय संस्कृतीत हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे दसरा सणाला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याला या दिवशी मुहूर्त केला जातो. त्यामुळे या दिवशी झेंडूच्या फुलाला विशेष मागणी असते. विजयादशमीच्या दिवशी घरांना झेंडूच्या फुलांची तोरणे बांधली जातात. वाहनांना झेंडूचे हार घातले जातात. पुजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. त्यामुळे झेंडूच्या फुलांना यादिवशी विशेष मागणी असते.

विजयादशमी निमित्त जव्हारची बाजारपेठ यंदा झेंडूच्या फुलांच्या विक्रीसाठी सजली आहे. शहरातील आदिवासी चौक, पचाबती नाका, गांधी चौकात फुल विक्रेत्यांनी झेंडुची फुले आणली आहेत. परंतु, यावर्षी मागील वर्षीपेक्षा झेंडूची फुले प्रति किलो १४० ते १५० अशा भाव असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला खर्चाची कात्री बसत आहे. मागील वर्षी झेंडूच्या फुलांचे दर १२० रुपये प्रतिकिलो होतो. ते दर यावर्षी २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. झेंडूची फुले अर्धा किलो ८० ते १०० रुपये तर, पाव किलो झेंडूची फुले ५० रुपये दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहेत. झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने बाजारपेठत दर चढले असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.

कोरोना निर्बंधांमुळे अनेक महिन्यांपासून मंदिरे बंदी असल्याने फुलांची मागणी घसरली होती. परंतु, आता मंदिरे खुली झाल्यानंतर फुलांची मागणी भाविकांकडून अचानक वाढली असल्याने फुल विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे फुलांच्या किंमती वाढल्याने झेंडूच्या फुलांचे भाव वाढले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत भाववाढ

मागील वर्षीपेक्षा झेंडूची फुले प्रति किलो १४० ते १५० अशा भाव असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला खर्चाची कात्री बसत आहे. मागील वर्षी झेंडूच्या फुलांचे दर १२० रुपये प्रतिकिलो होतो. ते दर यावर्षी २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. झेंडूची फुले अर्धा किलो ८० ते १०० रुपये तर, पाव किलो झेंडूची फुले ५० रुपये दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहेत. झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने बाजारपेठत दर चढले असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -