Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीराज्याने ओलांडला ९ कोटी लसीकरणाचा टप्पा

राज्याने ओलांडला ९ कोटी लसीकरणाचा टप्पा

२.७६ कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. राज्याने आतापर्यंत ९ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत शंभर कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले’ अभियानामध्ये सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांना एकत्रित करून लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.

राज्यात २३८४ नवे रुग्ण

गुरुवारी राज्यात २३८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५ लाख ८६ हजार २८० वर पोहोचला आहे, तर गुरुवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ३९ हजार ७०५ वर पोहोचला आहे.

गुरुवारी २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा ६४ लाख १३ हजार ४१८ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के, तर मृत्यूदर २.१२ टक्के आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर २ ते ३ हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी १४ ऑक्टोबरला २ हजार ३८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ३५ मृत्यूंची नोंद झाली असून २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के तर मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -