मुंबई : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “कोरोनाचे निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे” असे म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच “शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत” अशी प्रार्थना देखील मनसेने देवीकडे केली आहे.
आजचा रंग – गुलाबी
शिक्षणाची दुरावस्थाआज दीड वर्षांनी शाळा उघडतायत मात्र शाळा सुरु नसतानाही खाजगी शाळांनी पालकांकडून सर्रास फी घेऊन लूट माजवली.
एमपीएससी आणि इतर महत्त्वांच्या परीक्षांचा सावळा गोंधळ तर अजूनही सुटला नाही, परिणामी सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य अजूनही अंधारातच आहे pic.twitter.com/5K9B657CyT— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 14, 2021
शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. “आज दीड वर्षांनी शाळा उघडतायत मात्र शाळा सुरू नसतानाही खाजगी शाळांनी पालकांकडून सर्रास फी घेऊन लूट माजवली. एमपीएससी आणि इतर महत्त्वांच्या परीक्षांचा सावळा गोंधळ तर अजूनही सुटला नाही, परिणामी सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य अजूनही अंधारातच आहे. त्याची जबाबदारी हे सरकार कधी घेणार? कोरोनाचं निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे. दरदिवशी वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालक यांना अजूनच बुचकळ्यात पाडत आहेत” असे त्यांनी म्हटले आहे.
“आई, आज तुझ्या माध्यमातून या शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत अशी प्रार्थना करते…
“आई माझी अशी..
हाकेला धाव ग..
शिक्षणाचा झाला आमच्या
पुरता खेळखंडोबा ग..
कोण काय निर्णय घेते
याचा ना कुणाला मेळ ग..
तूच आता हातात घे छडी
आणि दे यांना शिक्षा ग..””
असे शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
"आई माझी अशी..
हाकेला धाव ग..
शिक्षणाचा झाला आमच्या
पुरता खेळखंडोबा ग..
कोण काय निर्णय घेते
याचा ना कुणाला मेळ ग..
तूच आता हातात घे छडी
आणि दे यांना शिक्षा ग.."#rajthackeray#amitthackeray#mnsadhikrut#भ्रष्टाचार#coruption#Education— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 14, 2021