
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झाला. आता पुन्हा हवामान खात्याने येत्या १६ ते १८ ऑक्टोबरपासून मेघ गर्जनासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अकोला, बुलडाणा, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, लातूर, परभणी, यवतमाळ, गोंदिया, नांदेड या पंधरा जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जाहिर केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत परतीचा पाऊस सुरू झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी शेतीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिले आहेत.