Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पत्रकार संघाच्या अध्यक्षीय दालनास राज्यपालांची भेट

पत्रकार संघाच्या अध्यक्षीय दालनास राज्यपालांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षीय दालनास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी पत्रकार संघाविषयी राज्यपालांना माहिती देताना वाबळे म्हणाले की, मुंबई मराठी पत्रकार संघ ही ऐंशी वर्षे जुनी संस्था आहे. त्यावर राज्यपाल मिष्कीलपणे पटकन म्हणाले, ‘मी देखील ऐंशी वर्षांचा आहे.’ तेव्हा उपस्थितांत एकच हशा पिकला. छायाचित्रात मुंबईतील बांगलादेशचे डेप्युटी हायकमिश्नर लुतफूर रहमान व संघाचे कार्यवाह खलील शरीफ गिरकर दिसत आहेत.

Comments
Add Comment