Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेआपट्याच्या पानातून साजरा होतोय, आदिवासींचा सोनियाचा दिन

आपट्याच्या पानातून साजरा होतोय, आदिवासींचा सोनियाचा दिन

शिवाजी पाटील

शहापूर : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, आपल्या सर्वांच्या जीवनात परिवर्तनाचे व आनंदाचे क्षण आणणारा दसरा हा सण साजरा करण्यासाठी आपट्यांच्या पानांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील आदिवासी बांधव आपट्यांची पाने गोळा करण्यासाठी वणवण भटकत असतात. रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावताना दिसते.

धार्मिक, आयुर्वेदिक महत्त्व असलेली ही पवित्र पाने आपणापर्यंत पोहोचविणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनात मात्र पानांपासून मिळणारी मिळकतच आनंद निर्माण करत असते. त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठीही तेच पुढाकार घेतात, निसर्गाचे रक्षण करतात म्हणूनच त्यांना निसर्गही भरभरून देत असल्याचा प्रत्यय दसरा सणाच्या निमित्ताने येतो. दसरा सणानिमित्त बाजारात आपट्याच्या पानांची गर्दी केली असली तरी ही सोनपत्ती आणण्यासाठी आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासह शहापूरात असलेल्या उपजत जंगलातीलआपट्यांची पाने गोळा करण्यासाठी भटकंती करत असतात.

अगदी दिवसभरात जेवढे हाती लागेल तेवढीच पाने जमा करून त्यांचे गठ्ठे बांधतात आणि सणाच्या आगोदरच्या दिवशी ही पाने घेऊन कसारा, खर्डी, आटगांव, तानशेत, उंबरमाळी, वासिंद, आसनगांव खडावली स्थानकातून कल्याण, ठाणे, दादर व उपनगरात रात्रीच्या वेळेत घेऊन जातात. संपूर्ण रात्र एखाद्या फुटपाथवर अथवा पादचारी उड्डाणपुलाखाली काढून पहाटेच्या वेळेत ती व्यापाऱ्यांना विकतात. अनेक वेळा व्यापारी मागेल त्या नाममात्र किमतीत विकून परतीचा मार्ग शोधत आपल्या कुटुंबाकडे जातात़ मात्र रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावत असल्याचे भातसा परिसरातील आदिवासी बांधव सांगतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -