Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडी'आर्यन घेतो नियमित ड्रग्ज'

‘आर्यन घेतो नियमित ड्रग्ज’

सुनावणीदरम्यान एनसीबीचा दावा

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा नियमित ड्रग्ज घेणारा आहे, असा दावा एनसीबीने केल्याने या प्रकरणात आर्यनला किमान एका वर्षांची शिक्षा होऊ शकते. आज या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्या दरम्यान एनसीबीने केलेल्या एका युक्तिवादामध्ये धक्कादायक माहिती सांगितली. त्यामुळे येत्या काळात आर्यनच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आर्यनने पहिल्यांदाच ड्रग्जचे सेवन केलेले नाही. यापूर्वी देखील त्याने ड्रग्जचे सेवन केले आहे. तो मागिल ४ वर्षांपासून नियमित ड्रग्ज घेत आहे, असा खुलासा एनसीबीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या काही काळासाठी न्यायालयाचे कामकाज तहकुब करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा – आर्यन खानसह तिन्ही आरोपी विदेशी ड्रग्स तस्करांच्या संपर्कात

दुपारी दोनच्या दरम्यान आर्यनच्या प्रकरणावर सुनावणी झाली. मात्र त्यावेळी एनसीबीच्या वतीने जो युक्तिवाद करण्यात आला त्यात आर्यनबद्दल वेगळी माहिती सांगण्यात आली. त्यात महाधिवक्ता अनिल सिंग यांनी सांगितले की, सध्या हाताशी असलेली माहिती आणि पुरावे पाहता आर्यनला किमान एका वर्षांची शिक्षा होऊ शकते. तो ड्रग्जचे नियमित सेवन करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी सिंग यांनी अरबाज मर्चंट याच्याविषयीही काही गोष्टी कोर्टासमोर ठेवल्या.

अद्याप या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान हा कोठडीत आहे. त्याला सोडविण्यासाठी शाहरुखचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्यात त्याला यश आलेले नाही.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्थर रोड जेलमध्ये आर्यनला ठेवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला किमान एका वर्षांची शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. आता त्यावरही न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

दरम्यान आर्थर रोडमध्ये क्वारंटाइन बराकमध्ये असलेल्या आर्यनचा क्वारंटाइनचा कालावधी संपला असल्याने आर्यन खानला कारागृहातील इतर कैद्यांसोबत राहावे लागणार आहे. आर्यनचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता त्याला क्वारंटाइन बराकमधून इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आले आहे.

आर्यन खानवर एनसीबीने आरोप केला आहे की, “तो परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता जे बेकायदेशीर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा भाग असल्याचे दिसते आणि तपास चालू आहे. जामीन मिळाल्यास तो देश सोडून जाऊ शकतो या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असे एनसीबीने म्हटले आहे.

संबंधित बातम्या…

बोटीवर ड्रग्ज पार्टी, बेफिकीर बाॅलिवूड

क्रूझवरील पार्टीला परवानगी कोणी दिली?

मुंबईच्या खोल समुद्रात क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा

तस्करी होत असताना राज्य गृहमंत्री झोपलेत का?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -