Thursday, October 30, 2025
Happy Diwali

आर्यन खान तुरुंगातच

आर्यन खान तुरुंगातच

२० ऑक्टोबरला जामीनावर निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याच्या जामिनावर न्यायालयाने गुरूवारी निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जामीन लांबला असून येत्या बुधवारी २० ऑक्टोबर रोजी आर्यन याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे आजही आर्यनला दिलासा मिळाला नसल्याचे चिन्ह आहे.

आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद ‘एनसीबी’चे वकिल अनिल सिंह यांनी केला. अनेक तासांच्या सुनावणी नंतरही आर्यन खानला जामीन मिळाला नाही. आता या प्रकरणाचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. त्यामुळे आर्यनला तोपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील ६ दिवस त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरूख आणि आर्यनच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत.

दरम्यान, आर्यन खानसह पाच आरोपींना क्वारंटाईन बराकमधून काढून कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले की आर्यन आणि उर्वरित आरोपींचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जाविरोधात ७२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला आहे. या हस्तक्षेप अर्जाला आर्यनच्या वतीने सतीश मानेशिंदे यांनी विरोध केला होता. ते म्हणाले की हा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कोर्टाने बुधवारीच फिर्यादी आणि आरोपींची सुनावणी केली आहे. हस्तक्षेप अर्जामध्ये दावा करण्यात आला आहे की ड्रग्जचा संपूर्ण देशावर परिणाम होत आहे, त्यामुळे त्याची सुनावणी झाली पाहिजे.

Comments
Add Comment