Tuesday, July 16, 2024
Homeमहामुंबईबसचा मार्ग पूर्ववत करा: विक्रोळीत सह्यांची मोहीम

बसचा मार्ग पूर्ववत करा: विक्रोळीत सह्यांची मोहीम

घाटकोपर (वार्ताहर) : विक्रोळीच्या कन्नमवार नगर या ठिकाणी मोठी कामगार वस्ती आहे. या भागातून थेट दादरला जाणारी ३५४ क्रमांकाची एकमेव बस होती. या बसचा मार्ग बेस्ट प्रशासनाने बदललेला आहे.

गेल्या एक महिन्यापासून या बसचा मार्ग बदलण्यात आला. यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान नव्या मार्गाला भाजपने विरोध केला आहे. आधीच्या मार्गाला मोठी मागणी असताना देखील बसचा मार्ग बदलण्यात आला आहे. हा मार्ग पूर्ववत करावा यासाठी भाजपने माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रथमेश राणे व केतकी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सह्यांची मोहीम कन्नमवार नगर जनता मार्केट येथे राबविली.

या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ३५४ बसचा मार्ग पूर्ववत केला नाही, तर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार मंगेश सांगळे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -