
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्काराच्या अग्निडाहानंतर थंड झालेली राख झाडून गोळा करीत स्माशनभूमीतील बर्निंग स्टॅण्ड परिसर स्वच्छ करून स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या निर्मला भिमोरे यांनी स्मशान स्वच्छतेचा वसा जपला आहे.
कल्याणमधील निर्मला भिमोरे गेली २५ वर्षांपासून कल्याणमधील लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीत कुणी स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकत त्या स्माशनभूमी स्वच्छतेचे काम गेल्या करीत आहेत. कोव्हिड काळात स्माशनभूमीत जाण्याचे अनेकांनी टाळले असताना देखील निर्मला यांनी स्वच्छतेचा वसा कायम ठेवत स्माशनभूमी स्वच्छतेचे काम सुरू ठेवले आहे. पतीच्या आजारपणानंतर सुरू केलेले काम आजवर सुरूच ठेवले आहे. अशा कर्तुत्ववान निर्मला भीमोरे यांच्या कामाची दखल घेणे गरजेचे आहे.