Saturday, May 10, 2025

देश

गांधीजींच्या सल्ल्यानंतरच सावरकरांची इंग्रजांपुढे दया याचिका

गांधीजींच्या सल्ल्यानंतरच सावरकरांची इंग्रजांपुढे दया याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधीं यांच्या सांगण्यावरूनच इंग्रजांपुढे दया याचिका दाखल केली होती, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केला.


एका वेगळ्या विचारधारेनं प्रभावित गट वीर सावरकर यांच्या आयुष्य आणि विचारधारेशी अपरिचित आहे. त्यांना याची योग्य समज नाही आणि त्यामुळेच ते प्रश्न विचारत राहतात. विचारधारेच्या चष्म्यातून पाहिलं तर वीर सावरकर यांच्या योगदानाची उपेक्षा करणं आणि त्यांना अपमानित करणं क्षमा योग्य आणि न्यायसंगत नाही, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. उदय माहूरकर आणि चिरायु पंडित लिखित 'वीर सावरकर हू कूड हॅव प्रीव्हेन्टेड पार्टिशन' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.


विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र, सावरकरांच्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील' अशी गांधींनी म्हटल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

Comments
Add Comment