Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीकेंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर

शरद पवार यांचा आरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : एनसीबी, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी अशा विविध केंद्रीय यत्रणांकडून राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर होत असलेल्या कारवायांनी धास्तावलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाया राजकीय हेतूने केल्या जात असल्याचा आरोप केला.

केंद्र सरकार काही इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याची पावले सतत टाकत आहे. सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी, या सगळ्या यंत्रणांचा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही उदाहरणे सांगायची झाल्यास, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी काही आरोप केले. त्यातून वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाही. एक जबाबदार अधिकारी बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तत्काळ पदावरुन दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला परमवीरसिंग यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरू झाली आहे. हे आरोप होत असताना परमवीरसिंग गायब झाल्याचे दिसते. अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच-पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला जातो, याचा अर्थ हा विक्रमच त्यांनी केला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत लगावला. सत्तेचा गैरवापर फक्त राष्ट्रवादी काँग्रेसवरच होतो, असे नाही. इतरही पक्षांना याचा फटका बसला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे प्रयत्न करुनही पाडता आले नाही म्हणून नेत्यांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोकांना बदनाम केले जात आहे. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही. एनसीबीने गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या अंमली पदार्थांची क्वाटिंटी अतिशय कमी आहे. याउलट महाराष्ट्राच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कितीतरी अधिक पटीने अंमली पदार्थ जप्त केले. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -