कर्जत (प्रतिनिधी) : परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील विज वितरण कंपनीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोज सायंकाळी विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. उष्मा वाढत असल्याने विजेची मागणीदेखील जोर धरू लागली आहे. परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून सायंकाळी ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो.
लख्ख विजेचा प्रकाश आणि जोरदार ढगांचा कडकडाट आणि पावसामुळे कर्जत तालुक्यात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन नागरिक त्रस्त झाले आहेत. काल सायंकाळी झालेल्या वादळी व विजेच्या कडकडाटासह पावसामुळे कळंबोली येथून कर्जतसाठी येणाऱ्या मुख्य विज वाहिनीवर झाड पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला झाला. तर नाना मास्तर नगर ते माळवाडी रोड जवळ विज वितरण वाहिन्यांवर झाडे पडल्याने वाहक ताराचे नुकसान झाले. यामुळे सांयकाळीपासून रात्रीपर्यंत विज प्रवाह खंडित झाला होता मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्या देखरेखीखाली कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करून विज पुरवठा पूर्ववत केला.