Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणगणेशोत्सवात कोकण रेल्वेवर २ लाख ४० हजार प्रवाशांची वाहतूक

गणेशोत्सवात कोकण रेल्वेवर २ लाख ४० हजार प्रवाशांची वाहतूक

रत्नागिरी (प्रतिनिधी): कोकण रेल्वेने गणेशोत्सवात २ लाख ४० हजाराहून अधिक भाविकांची कोकण रेल्वेने ने-आण केली. प्रवासी वाहतुकीतून महामंडळाने ७ कोटी ७२ लाख रुपयांचा व्यवसाय केला.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने टप्प्या-टप्प्याने नियोजन करत कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी स्पेशल गाड्यांची घोषणा केली. पहिल्या टप्यात जाहीर झालेल्या गाड्या तात्काळ आरक्षित होताच चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी अधिकच्या स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली . उत्सवाच्या दोन दिवस आधीपासून गणेश चतुर्थीपर्यंत कोकण रेल्वेने मार्गावर तब्बल २५६ गाड्यांचे नियोजन केले . नियमित मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक सांभाळत अधिकच्या २५६ फेऱ्या मार्गावरून नेणे सोपे नव्हते. पण हे आव्हान कोकण रेल्वेच्या कामगार अभियंता आणि अधिकाऱ्यानी या काळात आपल्या घरात उत्सव असताना अहोरात्र काम करत यशस्वी केले.

कोरोनाच्या काळात कोकणातील श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्याची जवाबदारी यशस्वीपणे पार पडल्यामुळे कोकण रेल्वेने त्यावेळी केलेल्या नियोजनाचे कौतुक झाले होते. आता गणेशोत्सवातही कोकण रेल्वेने महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाच्या नियोजनाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली असताना कोकण रेल्वेने नेटकं नियोजन करत मुंबईतून कोकणातील गावागावात आणि उत्सवाच्या सांगतेनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखरूप बनवला.

गणेशोत्सवापूर्वी आधी युद्ध पातळीवर काम करत कोकण रेल्वेने वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करून घेतले. याचा फायदा गणेशोत्वाच्या काळात झाल्या. कोकण रेल्वे ने केलेल्या योग्य नियोजनामुळे या काळात कोणत्याच गाड्या मार्गावर रखडल्या नाहीत आणि चाकरमानी वेळेत आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचला. कोकण रेल्वेने वेळोवेळी केलेली वेळापत्रके लोकांपर्यंत पोहोचण्यात माध्यमांनी मोठं सहकार्य केले.जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महिनाभरा आधीपासून नियोजन केल्याने आरोग्य तपासणी आणि वाहतूक नियमनाची कामे सोपी झाली. या करीता कोकण रेल्वेने सहकार्य करणाऱ्या या सर्व यंत्रणांचे आभार मानले.

कोकण रेल्वेच्या सर्वच स्तरावरील कर्मचारी आधिकारी यांच्यासह आरपीएफ, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने संपूर्ण सहकार्य केल्याने हे नियोजन यशस्वी झाले, अशा भावना कोकण रेल्वे कडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -