Friday, July 5, 2024
Homeमहत्वाची बातमीचित्रपट-नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून होणार सुरू

चित्रपट-नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून होणार सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्याच दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात येत आहे. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात हे सर्व चालू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी दिली.

शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.शॉपिग मॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरवण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.

सिनेमागृहे आणि मल्टीप्लेक्समध्ये ५० टक्के आसनक्षमता प्रेक्षकांची असेल. याचाच अर्थ दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात यावे. तसेच ५० टक्के आसनक्षमता असताना सिनेमागृहांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

नाट्यगृह / रंगभूमीची परिवास्तू (देखाव्यांसहित)सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे  समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात.नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. नाट्य कलाकारगण आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.कोविड पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळया जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास येत्या २२ ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -