Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

अमित खरे यांची पंतप्रधानांचे सल्लागार

अमित खरे यांची पंतप्रधानांचे सल्लागार

नवी दिल्लीः अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित खरे हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ही नियुक्ती करारावर केली जाते.

अमित खरे हे ३० सप्टेंबरला सचिव (उच्च शिक्षण) पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाचे नवीन 'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०' ला मंजुरी दिली होती. खरे यांनी चारा घाटोळा उघड केला होता.

या चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांना तुरुंगात जावे लागले. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी चारा घोटाळाप्रकरणी एफआयआर दाखल केला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >