Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

विकासकामांसाठी मुंबईतील ४८५ झाडे तोडणार

विकासकामांसाठी मुंबईतील ४८५ झाडे तोडणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत पालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल ४८५ झाडे तोडण्यात येणार आहेत. मात्र या झाडांच्या बदल्यात १०७६ झाडेही नव्याने लावण्यात येणार असून १७९ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. या बाबतच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीत दहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबईत कोणत्याही प्रकल्पासाठी, विकासकामांसाठी झाडे तोडावी लागतात. मात्र त्यापूर्वी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक असते. एकाच कामासाठी २०० हून जास्त झाडे तोडायची असल्यास राज्य सरकारची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. यानुसार २०० पेक्षा जास्त झाडे तोडण्याचे दोन प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण बैठकीत होते ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

मंगळवारी झालेल्या बैठकीत रेल्वे, एमएमआरडीए, मेट्रो, राज्य सरकारच्या अखत्यारीतील एकूण २२ प्रस्ताव मांडण्यात आले. यातील दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर दोन प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले.

मुंबईत पालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल ४८५ झाडे तोडण्यात येणार आहेत. मात्र या बदल्यात झाडेही नव्याने लावणार आहे.

Comments
Add Comment