नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिल्याचे वृत्त आले होते. मात्र आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) लसीच्या वापरासाठी मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मूल्यमापन अद्याप सुरू आहे. काही गोंधळ आहे आणि तज्ज्ञ समितीशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने त्याला मान्यता दिलेली नाही, अशी मीहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. भारतात विकोसित झालेल्या करोना लस कोव्हॅक्सिनचे निर्माता भारत बायोटेकने शनिवारी २-१८ वयोगटातील मुलांसाठी चाचणी डेटा डीसीजीआयला पाठवला आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी ही माहिती दिली. लहान मुलांवर केलेल्या कोरोना लसीच्या चाचणीचे निकाल समाधानकारक आहेत. यामध्ये तीन चाचण्या झाल्या आहेत. चाचणीचे निकाल डीसीजीआयला सादर करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, लवकरच कोव्हॅक्सिनला मान्यता मिळू शकते. तसेच लसीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून मुलांना जारी केली जाऊ शकतात.