Wednesday, July 3, 2024
Homeदेशकौटुंबिक मूल्यांचे जतन करण्याची गरज : मोहन भागवत

कौटुंबिक मूल्यांचे जतन करण्याची गरज : मोहन भागवत

डेहराडून (वृत्तसंस्था): भारतीयांनी कौटुंबिक मूल्यांचे जतन करण्याची गरज असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. येथे त्यांनी आरएसएस कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

हिंदू समाज संघटित करणे हाच आरएसएसचा मुख्य हेतू आहे. पण जेव्हा आम्ही आरएसएसचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत, असे भागवत यांनी म्हटले आहे.

ड्रग्ज कुठून येते, हे पाहा

मोहन भागवत यांनी यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व समजावून सांगताना पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते, असे सांगितले. तसेच ही मूल्यं नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला. लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये अफीम (ओपियम) पाठवले. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केले. आपल्या देशातही हेच सुरू आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरण पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिलंत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल,” असं मोहन भागवत म्हणाले.

धर्मांतर मोठी चूक

लग्नासाठी धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. एका छोट्या स्वार्थासाठी हे सर्व घडत होते, हे सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू कुटुंब आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासंबंधी, परंपरा आणि मूल्यांचं शिक्षण देत नव्हती असंही म्हटले आहे. धर्मातर कसे काय होते? आपल्या देशातील मुले, मुली इतर धर्मात कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी. करणारे चुकीचे आहेत हा मुद्दा वेगळा आहे. पण आपण आपली मुलं तयार करत नाही, असं मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

ओटीटीवर मुले काय पाहतात, याकडे लक्ष ठेवा

मोहन भागवत यांनी यावेळी पालकांना आपली मुलं ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय पाहतात यासंबंधी काळजी घेण्याचंही आवाहन केले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पहायला मिळतं. माध्यमांमध्ये जे येतं ते मुलांसाठी आणि आपल्या मूल्यांच्या व्यवस्थेसाठी काय चांगलं होईल या दृष्टीकोनातून नसतं. आपणच मुलांना घरात काय पहायला हवं आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -