Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

पूरग्रस्तांच्या खात्यात लवकरच पैसे होणार जमा

पूरग्रस्तांच्या खात्यात लवकरच पैसे होणार जमा

कल्याण (प्रतिनिधी) : जुलैमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील शहर व ग्रामीण परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसानाची झळ पोहोचली आहे. शासनाने कल्याण विभागाच्या पूरग्रस्त नागरिकांना १३ कोटी रुपये वाटपासाठी दिले असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात पूराने जनजीवन विस्कळीत झाले होते. किमान पंधरा ते सोळा हजार लोकांच्या घरात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले होते. कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून याबाबत तलाठ्यांमार्फत प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरुवात करून पूरग्रस्त नागरिकांकडून बँक अकाउंट तसेच आधार कार्डची झेरॉक्स देण्यात आले होते.


पूरग्रस्त पंचनाम्यात बहुतेक पूरग्रस्तांनकडून संबंधित कागदपत्र तसेच बँक खात्यांचे अकाउंट नंबर चुकीचे दिले असल्याने याबाबत खात्रीशीर चाचपणी करण्यात येत असून पूरग्रस्तांना प्रत्येकी घरटी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात येत्या १५ दिवसात जमा केली जाणार असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात पूराने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Comments
Add Comment