मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. त्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र बंद विरोधात राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘कोणी मला माहिती देऊ शकेल का, की आज वसूली चालू आहे की बंद?’ असे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र बंद नाही असा हॅशटॅगही दिला आहे.
Can anyone update me –
आज वसूली चालू है या बंद ?#MaharashtraBandhNahiHai— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 11, 2021
हे सुद्धा वाचा – महाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध
लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चालवली. या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे,’ अशी टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच या घटनेबद्दल तिथले सरकार दोषींवर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.