
मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि जनतेचा विरोध होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्र बंद जनतेवर लादला आहे. त्यामुळे हा 'शासकीय इतमामातील' बंद असून ठाकरे सरकारला जनताही अशाचप्रकारे 'शासकीय इतमामात' निरोप देईल, अशी टीका भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द खूप प्रिय आहेत. आणि याचा अनुभव महाराष्ट्राची जनता गेले पावणे दोन वर्ष घेत आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येऊन शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे जीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे आणि यातच जनतेवर बंद लादण्यात आला.
हे सुद्धा वाचा - ‘आज वसूली चालू आहे की बंद?’
जनतेचा महाराष्ट्र बंदला विरोध होता, परंतु शासकीय अधिकारी जनतेच्या मनात भिती निर्माण करत होते, तर बेस्टचे महाव्यवस्थापक बंद यशस्वी होण्याच्या कामाला लागले होते. जनतेच्या मनात भिती निर्माण करून महाराष्ट्र बंद लादण्यात आल्यामुळे हा बंद 'शासकीय इतमामातील' बंद असल्याचे आशिष शेलार म्हणाले.