Tuesday, March 18, 2025
Homeक्रीडाश्रीलंका संघात चार बदल

श्रीलंका संघात चार बदल

टी-ट्वेन्टी वर्ल्डकप

कोलंबो (वृत्तसंस्था) : आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठीच्या श्रीलंका संघात चार बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त असलेल्या लहिरू मदुशंका आणि नुवान प्रदीप यांच्यासोबत प्रवीण जयाविक्रमा आणि कामिंदु मेंडिस यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पथुम निसंका, अकिला धनंजय, लहिरू कुमारा आणि बिनुरा फर्नांडो यांना संधी मिळाली आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकन निवड समितीने सोमवारी १५ खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी जाहीर केली. अकिला हा श्रीलंकेच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय संघात खेळला आहे. गोलंदाजीच्या अॅक्शनमध्ये बदल केल्यानंतर त्याच्या कामगिरीवर फरक पडला आहे. मागील नऊ टी-ट्वेन्टी सामन्यात त्याने फक्त ६ विकेट बाद केले आहेत. मात्र त्याचा अनुभव पाहता त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, कामिंदु मेंडिसला संघात स्थान मिळालेलं नाही. त्याच्याऐवजी पथुम निसंकाला संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज मदुशंका आणि प्रदीप यांचा दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे.

टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका संघाला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. १८ ऑक्टोबरला नामिबिया संघाविरुद्ध पात्रता फेरीच्या पहिला सामना होणार आहे. त्यानंतर २० आणि २२ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे आयर्लंड आणि नेदरलँडविरुद्ध सामने होतील.

श्रीलंका संघ : दसून शानका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, कुशल परेरा, दिनेश चंडिमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजापक्ष, चरिथ असलंका, वहिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ना, दुश्मांता चमीरा, महीश थीक्षना, लहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजय, पथुम निसंका

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -